धक्कादायक ! परभणीमध्ये सुसाईट नोट लिहून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने चक्क हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. रामू बळीराम गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रामू बळीराम गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या हिवरखेडा येथील रहिवाशी होता. तो बारावीला होता. त्याने हॉस्टेलमधील एका रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री त्याने गळफास घेतला. मात्र, सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यावेळी पोलिसांना रूममध्ये एक सुसाईट नोटदेखील आढळून आली.
काय लिहिले सुसाईट नोटमध्ये ?
पोलिसांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर एक सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये “सबका / सभी का बदला लूंगा, फिर लौटूगा” असे लिहिले आहे.आत्महत्या केलेल्या रामूचे वडील शेतकरी आहेत. तीन बहिणी आणि एकुलता एक असलेला रामू याला शिक्षणासाठी वडिलांनी परभणी येथील राजे संभाजी गुरुकुल येथे ठेवले होते.





