संतापजनक ! परभणीत शाळेच्या टॉयलेटमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार

परभणी : बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्यात झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. लहान मुलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेने लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. अशीच एक संतापजनक घटना परभणीमधून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
यामध्ये एका इंग्रजी शाळेत बालवाडीत अर्थात एलकेजीत शिकणा-या मुलीवर अत्याचार झाला आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील स्वच्छतागृहातच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. मुलीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कसा उघडकीस आला प्रकार?
अल्पवयीन मुलगी इंग्लीश स्कूलमध्ये बालवाडीला शिकत आहे. 5 ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आल्यानंतर मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पिडितेच्या अंगावर ओरखडे दिसून आले. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सोनपेठ पोलीस ठाण्यात पोक्सो सह इतर कलमाखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्याच्या सुरक्षेविषयी मोठी भीती निर्माण झाली आहे.





