धक्कादायक ! परभणी दगडफेक प्रकरणी कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू

Parbhani case । परभणीत दगडफेक प्रकरणाने संपूर्ण राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . या प्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली. आता याच प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
संविधान शिल्पाची तोडफोड प्रकरणी 50 जणांना ताब्यात Parbhani case ।
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय मृत तरुणचे नाव आहे.कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय झालं होतं ? Parbhani case ।
परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले.या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
हेही वाचा
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का ; नगरसेवक रमेश पहेलवान पत्नीसह ‘आप’मध्ये सामील





