पारगाव : पारगाव येथील श्री. सालू मालू मंदिरात श्री. सालु मालू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात गावकरी भक्तिरसात चिंब झाले आहे. (दि.६) ते १३ डिसेंबर या कालावधीत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा चालू आहे. यामध्ये हभप हनुमंत महाराज मारकड, हभप संग्राम बापू भंडारे, हभप मिलिंद महाराज ढम, हभप दयानंद महाराज कोरेगावकर, हभप प्रदीप महाराज नलावडे, हभप सुनील महाराज झांबरे, हभप सागर महाराज बोराटे, हभप कविराज महाराज झावरे, तर (दि.१४) श्री. दत्त महाराज जयंतीनिमित्त हभप चंद्रकांत महाराज खळेकर आदी नामवंत कीर्तनकारांच्या किर्तन सेवेचे आयोजन केले आहे. पूर्ण सप्ताहात सायंकाळी ७ ते ९ या वेळेस कीर्तन व यानंतर महाप्रसाद असे नियोजन केले आहे. यामध्ये अनेक दानशूर ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला असून प्रत्येक दिवशी श्रोतेजनांची उपस्थिती लक्षणीय ठरत असल्याचे वैभव बोत्रे यांनी सांगितले.