नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत . तसेच महिला दिनानिमित्त पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट महिला चालवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी रविवारी सकाळी नारी शक्ती पुरस्कार मिळालेल्या महिलांशी संवाद साधतील. दरवर्षी महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात करणाऱ्यांना सरकारतर्फे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.