Pankaja Munde : राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, अनेकांचे स्वप्न अधुरे राहिले आणि राजकारणच त्यांचे क्षेत्र बनले. असे अनेक नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना राजकारणाऐवजी डॅाक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडल्यामुळे त्यांना या पेक्षात जाते आले नाही. याविषयी त्यांनी स्वतः एका जाहीर कार्यक्रमात खुलासा करत त्यांचे डॅाक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याची खंत व्यक्त केली. नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? “मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतले नाही. आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या. आणि येसू ताई वकील झाल्या. धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असंच होतं ज्याला जे व्हायचं असतं ते होता येत नाही.” अशी खंत पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमातून व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर त्यांचे बंधू आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थिती होते. Pankaja Munde उद्योगाबाबत मोठं विधान तसेच पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात त्यांच्या उद्योगाबद्दलही मोठं विधान केले. माझा आणि माझ्या व्यवसायाचा तसा दूरवर संबंध नाही. मी एक मोठी डिस्टिलरी चालवते, पण तिथला कारभार कसा चालतो किंवा तिथला ब्रँड कोणता आहे, याची मला साधी माहितीही नसते, असे विधान त्यांनी केले. याच कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनीही मिश्किल फटकेबाजी केली. धनंजय मुंडेंच्या भाषणात त्यांचा तो अंदाज पुन्हा दिसला. कार्यक्रमातील अधिकाऱ्यांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आलात, उभे राहायचं सोडा इथं बसायची कशी अडचण होती हे तुम्ही सांगितलं. आम्ही मराठवाड्यातले दगडातले माणसं आहोत, दगडावरही बसतो. तुम्ही आमच्या प्रेमात पडाल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे बहीण भावामधील कौटुंबिक जिव्हाळा आणि राजकारणापलीकडची मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. हेही वाचा : Nasarapur case : नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; पोलिस प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना