पाथर्डी – शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी दुपारी एक वाजता पाथर्डी येथे जाहीर सभा होणार आहे.
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या सभेची भाजप व मित्र पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा झाल्या आहेत.त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भाजपकडून ना. मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.