“जब खुली किताब’मध्ये पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया हे दोघेजण लीड रोलमध्ये असणार आहेत. हे एका ज्येष्ठ दाम्पत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. सौरभ शुक्लाच्या एका नाटकावर हा सिनेमा आधारलेला असणार आहे.
त्या नाटकाचे नावदेखील “जब खुली किताब’ हेच होते. या सिनेमाचे डायरेक्शन देखील सौरभ शुक्ला करत आहे. पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया या दोन टॅलेंटेड ऍक्टर्स बरोबर अपारशक्ती खुरानादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
समीर सोनी, नोहिद सायरस आणि इतर काही जणदेखील या सिनेमात असणार आहेत. तब्बल 50 वर्षे एकमेकांची साथ दिलेले एक जोडपे उतार वयात घटस्फोट मिळण्याची मागणी करताना या सिनेमात दिसणार आहेत.
प्रेम आणि दीर्घ काळापासूनचे नातेसंबंध एका क्षणात नाहीसे होत असताना कुटुंबाची होत असलेली वाताहत या सिनेमात बघायला मिळणार आहे.
या कथेतील विरोधाभास काही वेळा मनमुराद हसवतोही आणि नात्यांबद्दल विचारही करायला लावतो आहे. पंकज कपूर बऱ्याच दिवसांनी एखाद्या सिनेमात दिसतो आहे.