Vishwas Patil : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

Vishwas Patil : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर पानीपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची वर्णी लागली आहे. साताऱ्यात हे संमेलन होणार असून अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. मात्र, विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाला असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, विश्वास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आलं.
कोण आहेत विश्वास पाटील?
विश्वास पाटील हे मराठी साहित्यप्रकारातील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं असून, त्यांच्या नावावर अनेक पुस्तक आहेत. त्यांची पानिपत ही ऐतिहासिक कांदबरी प्रचंड गाजली. त्याच्या आगळ्यावेगळ्या लेखकाने वाचकांच्या मनावर त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे.
या कांदबरीचे लेखन करण्याअगोदर विश्वास पाटील यांनी प्रचंड अभ्यास केला. त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते माजी आयएएस अधिकारी आहेत. गेल्या तीन दशकांत विश्वास पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह ७० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, नाथमाधव पुरस्कार आणि भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार यांचा समावेश आहे.
झाडाझडती : राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.
चंद्रमुखी : समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.
महाड़ : अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.
स्मरणगंध : आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.
हेही वाचा : लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत; टीझर पाहा….


