पुणे – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (सन 2023-24) निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर आणि खजिनदारपदी दैनिक ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांची निवड झाली आहे. तसेच सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी (दैनिक तरुण भारत) यांची निवड झाली आहे. ऍड. प्रताप परदेशी, ऍड. स्वप्नील जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (पुढारी), उपाध्यक्ष : उमेश शेळके (सकाळ), स्वप्निल शिंदे (महाराष्ट्र टाइम्स), सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत), खजिनदार : अंजली खमितकर (प्रभात), चिटणीस : पूनम काटे-कलापुरे (राष्ट्रसंचार), प्रज्ञा केळकर-सिंग (पुढारी), कार्यकारिणी सदस्य हर्ष दुधे, वरद पाठक (महाराष्ट्र टाइम्स), विक्रांत बेंगळे (आज का आनंद), शहाजी जाधव (सकाळ), श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाइम्स), विनय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत), शंकर कवडे, भाग्यश्री जाधव (पुढारी).