पुणे जिल्हा | पंडित डी. एम. कंक यांचा लोकरत्न पुरस्काराने सन्मान
Updated On:

हिरडस मावळ,(वार्ताहर) – भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वेनुपुरी (ता.भोर) येथील सुपुत्र संगीत अलंकार दगडू कंक यांना शंकरभाऊ मांडेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात लोकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
लहानपणापासून भजन कीर्तनाची आवड असणारे कंक यांना पुढे शास्त्रीय संगीता गोडी लागली. खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन संगीत विशारद झाले.संगीत अलंकार ही पदवी संपादन केली.
आणि भोरमध्ये संगीत विद्यालय सुरू केले. अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत, भजन, सुगम संगीताचे धडे दिले. विद्यार्थी घडवले,या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शंकरभाऊ मांडेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात भोर राजगड मुळशी तालुका व पुणे जिल्हातील विविध क्षेत्रातील ५१ मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

