Pandharpur Kartiki Wari 2024: उद्यापासून श्री विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू

पंढरपूर Pandharpur Kartiki Wari 2024: येत्या 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. आषाढी एकादशीनंतर कार्तिकी वारीला लाखों वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात. या पार्श्वभूमीवर सोहळ्याला येणाऱ्या लाखों भाविक वारकऱ्यांना अखंड विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी उद्यापासून (दि. 4) 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आषाढी व कार्तिकी या दोन यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी उद्यापासून 24 तास दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
आळंदी यात्रा 26 नोव्हेंबरला –
पंढरपूर कार्तिकी वारीनंतर वारकरी तीर्थक्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ होतात. यावर्षी 26 नोव्हेंबर ला आळंदीची कार्तिकी वारी आहे. तर 28 नोव्हेंबरला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. या वारीला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक वारकरी आळंदीत दाखल होत असतात. (Kartiki Ekadashi 2024)





