Aasif Khan : ‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खानने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ

‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधील कलाकारांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. याच सीरिजमध्ये गणेश हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता आसिफ खानने नुकतेच लग्न केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. त्याने त्याची गर्लफ्रेंड झेबा हिच्याशी १० डिसेंबर रोजी निकाह केला. आसिफ व झेबा यांचा निकाह पारंपरिक पद्धतीने पार पडला.
View this post on Instagram
लग्नाच्यावेळी आसिफने क्रीम कलरची शेरवानी तर झेबाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. “कुबूल है. 10.12.24 – ♾️” असं कॅप्शन देत आसिफने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आसिफने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र त्याचं नवीन प्रवासासाठी अभिनंदन करत आहेत.
आसिफ खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटचा रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्याबरोबर ‘काकुडा’ चित्रपटामध्ये दिसला होता. तसेच तो राशिक खानच्या आगामी सेक्शन 108 चित्रपटामध्ये दिसणार आहे.





