Panchayat । ॲमेझॉन प्राइमच्या सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’चा तिसरा सीझन नुकताच आला असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र स्वतःच खास वैशिष्ट्य दाखवणार आहे. प्रधानजी असोत की ग्रामपंचायत सचिव असोत, प्रत्येकजण आपापल्या परीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. या मालिकेसाठी प्रत्येक कलाकाराची निवड योग्य करण्यात आल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे, पण जर हा चित्रपट असेल आणि त्यात बॉलीवूड कलाकार असतील तर कोण कोणत्या भूमिकेत बसेल, याबाबत पंचायतीत मधील नीना गुप्ता, फैसल मलिक उर्फ प्रल्हाद चा आणि त्याचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा याची नुकत्याच दिलेल्या मुलाखती सांगितले आहे. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जर ‘पंचायत’ हिंदी चित्रपटसृष्टीची असती तर त्यात फुलेराचे प्रमुख कोण असते? यावर नीना गुप्ता यांनी लगेचच अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले. नीनाने सांगितले की, या भूमिकेसाठी त्याच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन. तर दीपक या भूमिकेसाठी नाना पाटेकर त्यांनी घेतले. यानंतर सचिवांसाठी नावे विचारण्यात आली, दीपक कुमार मिश्रा यांनी राजकुमार राव, विकी कौशल यांची नावे घेतले. दरम्यान, ‘पंचायत’ ही एका अभियांत्रिकी पदवीधराची कहाणी आहे जो नोकरीच्या मर्यादित संधींमुळे आपल्या गावातील पंचायतीचा सचिव बनतो. सीझन 3 येत्या 28 मे रोजी रिलीज झाला. यात नीना गुप्ता, रघुबीर यादव, जितेंद्र कुमार, चंदन रॉय आणि फैसल मलिक यांच्या भूमिका आहेत.