“पॅन तपशील अपडेट करा, नाहीतर खाते बंद…”तुम्हालाही ‘हा’ मेसेज आलाय का? तर मग वेळीच सावध व्हा ! ; पीआयबीकडून अलर्ट जारी

PAN Card Alert । आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे देखील आजच्या काळातील सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. हे कोणत्याही आर्थिक कामासाठी आवश्यक असते, परंतु सध्या पॅन कार्डशी संबंधित एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून 24 तासांच्या आत पॅन माहिती अपडेट करण्यास सांगितले जात आहे आणि तसे न केल्यास खाते बंद करण्याचा इशारा दिला जात आहे. पीआयबीने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून अशा पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे.
‘पॅन तपशील अपडेट करा, नाहीतर खाते बंद…’ PAN Card Alert ।
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांशी संबंधित एक बनावट पोस्ट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्याशी 24 तासांच्या आत पॅनशी संबंधित माहिती अपडेट करण्याच्या सूचना देण्यात येत असून तसे न केल्यास ग्राहकांची खाती बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही घाबरला असाल तर सावधान, कारण ती पोस्ट बनावट आहे आणि इंडिया पोस्टने ती माहिती दिली नाही. @IndiaPostOffice कडून असा कोणताही संदेश पाठवण्यात आलेला नाही, असे पीआयबीने स्पष्टपणे म्हटले आहे.
Claim: The customer’s India Post Payments bank account will be blocked within 24 hours if their Pan card is not updated. #PIBFactCheck:
❌ This claim is #Fake
➡️ @IndiaPostOffice never sends any such messages
➡️ Never share your personal & bank details with anyone pic.twitter.com/B7CEdp0g2f
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 4, 2025
इंडिया पोस्टने संदेश पाठवला नाही
PIB ने सोशल मीडियावर या पॅन कार्ड घोटाळ्याची माहिती शेअर करत पोस्ट केले असून अशा दाव्यांना खोटे ठरवून, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खातेधारकांना फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. फॅक्ट चेकमध्ये अशा पोस्ट फसव्या असल्याचे आढळून आले आहे आणि असे म्हटले आहे की इंडिया पोस्टने असे संदेश पाठवले नाहीत किंवा पाठवणारही नाहीत. पीआयबीनुसार, अशा बनावट संदेश किंवा पोस्टमध्ये संशयास्पद लिंक असते, ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ शकते.
कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला PAN Card Alert ।
पॅन कार्डशी संबंधित या घोटाळ्याबद्दल वापरकर्त्यांना सावध करण्याबरोबरच, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने असा सल्ला दिला आहे की लोकांनी या संदेशांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती सामायिक करणे टाळावे आणि खाते बंद करण्यासारखी कोणतीही कारवाई करू नये हे बनावट आहेत. इंडिया पोस्ट कधीही कोणताही संदेश पाठवत नाही.
सायबर गुन्हेगारांचे कारनामे
पीआयबीने या संदर्भात पॅन कार्ड वापरकर्ते आणि इंडिया पोस्टच्या ग्राहकांना आधीच सावध केले आहे आणि आता पुन्हा एकदा अशी पोस्ट व्हायरल झाल्यास इशारा दिला आहे. यामध्ये पीआयबीने ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की बँक खात्याची माहिती आणि पॅन कार्ड कोणाशीही शेअर करू नये असे सांगितले आहे. कारण सायबर गुन्हेगार अनेकदा असे बनावट संदेश पाठवून लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.





