हडपस -संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हडपसर येथून रविवारी (दि.14) मार्गस्थ होत आहे, याच्या पूर्वनियोजनासाठी आमदार चेतन तुपे यांनी प्रशासनातील विविध विभागांची आढावा बैठक घेतली.
तुकाराम महाराज संस्थानचे भानुदास मोरे, संजय मोरे, अजित मोरे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगेश देसाई, ऍड. विकास ढगे, पालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, पालिकेचे विभागीय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश भेंडे, डॉ. स्नेहल काळे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक आनंद आळकुंटे,मारूती तुपे, योगेश ससाणे, सुनील बनकर, फारुक इनामदार, सुभाष जंगले, शंतनू जगदाळे, पल्लवी सुरसे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या दोन्हीही संतांचे पालखीसोहळे हडपसर येथून सोलापूर व सासवड महामार्गाने पुढे जातात. शहर व परिसरातून त्यामुळे मोठ्याप्रमाणात भाविक या पालखीसोहळ्याला निरोप देण्यासाठी येत असतात. भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने प्रशासनातील विविध विभागांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा प्राथमिक आढावा घेण्यात आला. पालखी सोहळा पारपडेपर्यंत या सर्व विभांगांशी समन्वय ठेवला जाईल.
– चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा