पालघर : पालघर जिल्ह्यात पोलिसांनी १.८५ कोटी रुपयांचे अंबरग्रीस किंवा व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या तस्करीत सहभागी असलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माहितीच्या आधारे, पोलिसांनी नालासोपारा पूर्व येथे सापळा रचला आणि आरोपीला अटक केली, असे पोलिस उपायुक्त पूर्णिमा चौगुले-श्रृंगी (झोन-२, वसई) यांनी सांगितले. पथकाने जवाहर येथील रहिवासी कादर गफार कारघाश्रा (५२) याला अटक केली. त्याच्याकडून १.८५८ किलो अंबरग्रीस पदार्थ जप्त केला. ज्याची किंमत १.८५ कोटी रुपये आहे. या तस्करीच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आणि त्यांनी ठाणे येथील रहिवासी किशोर महादेव तपसले (३९) यालाही अटक केली. याप्ररकणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.