पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथील नितीन काळे सध्या जिल्हा उपनिबंधक मुंबई येथे कार्यरत आहेत. सशस्त्र सेना दिनाच्या निमित्ताने उदिष्ठापेक्षा जास्त निधी जमा करून उत्कृष्ट काम केले बद्दल राज्याचे राज्यपाल सी. एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. दरवर्षी सशस्त्र सेना दिनाच्या निमित्ताने निधी जमा करण्याचे प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते. त्यानुसार या वर्षी उपनिबंधक मुंबई येथे कार्यरत असताना नितीन काळे यांनी दिलेल्या उद्दिष्ठापेक्षा अधिक निधी जमा करून उत्कृष्ट काम केले आहे. त्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी तीनही सेना दलाचे प्रमुख तसेच विविध विभागाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पळसदेवच्या सुपुत्राचा सन्मान झाल्याबद्दल गावातून नितीन काळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई :राज्यपाल सी एस राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना नितीन काळे.