#INDvPAK : महेंद्रसिंग धोनी पाकिस्तानातही लोकप्रिय

नवी दिल्ली – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही लोकप्रियता टिकवून आहे. येथे सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यात बुधवारी एका क्रिकेट चाहत्याने चक्क धोनीची 7 क्रमांकाची जर्सी घातली होती.
पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यात धोनीच्या चाहत्याने पाकिस्तानच्या जर्सीवर धोनीचे नाव व त्याचा 7 क्रमांक झळकावल्याचे दिसून आले.
Craze Of MS Dhoni in Pakistan. ?? pic.twitter.com/xD0vIWag2X
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) March 9, 2020
मैदानात माही, पीएसएल लीग तसेच इस्लामाबाद युनायटेड संघाला पाठिंबा. इथे क्रिकेटप्रेमींचा जलसा भरला असला तरी माही आम्ही तुला मीस करतो असा संदेशही या चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. अर्थात त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तर नवल वाटायला नको.





