पाकिस्तानी लष्करासाठीची रायफल दहशतवादी अड्ड्यावरून जप्त

जम्मू – जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरूवारी पोलिसांनी दहशतवाद्यांच्या दडण्याचा एक अड्डा उद्धवस्त केला. त्या अड्ड्यावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात आढळलेल्या एका रायफलचा प्रकार पाकिस्तानी लष्कराकडून वापरला जातो. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केली जात असल्याच्या बाबीवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. जम्मू-काश्‍मीरच्या किश्‍तवाड जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे कारवाई करत पोलिसांनी तो अड्डा नेस्तनाबूत केला. त्या अड्ड्यावर ग्रेनेड, एके रायफलचे मॅगॅजिन आणि रायफलच्या काही गोळ्या आढळल्या. तो शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईवेळी संबंधित अड्ड्यावर एकही दहशतवादी नव्हता. मात्र, पाकिस्तानी लष्करासाठी वापरली जाणारी रायफल आढळल्याने त्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.