सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही टी-२० विश्वचषकाच्या चर्चा जोरात रंगात आहेत. तसे पहिले तर क्रिकेट आणि चित्रपट जगताचे नाते फार जुने आहे. अनेकदा फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्सची नावे एकमेकांशी जोडली जातात. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या नात्यांबाबतच्या अफवाही खूपच चर्चेत राहिल्या होत्या. दरम्यान, एका पाकिस्तानी अभिनेत्रीनेही क्रिकेटबाबत एक अजब-गजब ट्विट केलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने ( Sehar Shinwari ) ६ नोव्हेंबरला होणाऱ्या भारत-झिम्बाब्वे टी-२० सामन्याबद्दल ट्विट केले आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
#PAKvsSA | पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ३३ धावांनी हरवले! ‘या’ बाबतीत भारताला टाकले मागे
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने ( Sehar Shinwari ) तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की, “झिम्बाब्वे संघाने पुढील सामन्यात भारताला हरवले तर, मी झिम्बाब्वेच्या माणसाशी लग्न करेल.” रविवारी म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. सेहर शिनवारीच्या याच ट्विटने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. एवढेच नाही तर तिच्या या ट्विटमुळे ही अभिनेत्री नेटिझन्सच्या निशाण्यावरही आली आहे.
I’ll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match 🙂
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 3, 2022
सेहर शिनवारी ( Sehar Shinwari ) तिच्या ट्विटमुळे क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आली आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीला क्रिकेट चाहते मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. एका युजरने ट्विट केले की, ‘मग मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे कारण तू आयुष्यभर लग्नाविनाच राहणार आहेस.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘भारताने बांगलादेशला हरवल्यावर तुम्ही तुमचे ट्विटर अकाउंट डिलीट करायला हवे होते.’
then I feel sorry for you how will you live your whole life alone
— Mujahid Akhtar (@AkhtarMujahid) November 3, 2022
U were supposed to delete ur twitter account if India beats Bangladesh
— Suresh Kumar (@SureshK77282053) November 3, 2022
but the thing is will any Zimbabwean guy marry to you? … lmao 🤣
— Mohsin Sajad (@iammohsinsajad) November 3, 2022
He is super excited after seeing your tweet. pic.twitter.com/BuMPlimXVz
— OptionTrader (@OptionT02594842) November 3, 2022