#PAKvBAN T20 Series : पाकिस्तानचा २-० ने मालिकाविजय

लाहोर : पाकिस्तान विरूध्द बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० ने जिंकली आहे.
https://twitter.com/TheRealPCB/status/1221749561917612033?s=19
पाकिस्तानच्या बाबर आझमला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
https://twitter.com/TheRealPCB/status/1221760389521838083?s=19
मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यापूर्वीच पाऊसाला सुरूवात झाली. त्यामुळे टाॅसही होऊ शकला नाही आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत पाकिस्तानने याआधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली असल्याने तिसरा सामना रद्द झाल्याने त्यांनी २-० असा मालिकाविजय मिळवला.
https://twitter.com/TheRealPCB/status/1221762567560814592?s=19
दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताने बांगलादेशवर ५ विकेटनी तर दुस-या सामन्यात ९ विकेटनी विजय मिळविला होता.





