Pakistan tour of Zimbabwe : आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी पाक संघाची घोषणा, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू….

Pakistan Squad For Zimbabwe Tour : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिला एकदिवसीय सामना 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर टी-20 मालिका 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बाबर आझमला वनडे आणि टी-20 मालिकेत संधी देण्यात आलेली नाही.
झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे टी-20 मालिका खेळायची आहे. बोर्डाने या मालिकेसाठी पाकिस्तान संघाचीही घोषणा केली आहे. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या स्टार खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळालेली नाही.
🚨 Announcing Pakistan’s squads for the Australia and Zimbabwe tours 🚨
Read more ➡️ https://t.co/vzc7iFBINJ#AUSvPAK | #ZIMvPAK pic.twitter.com/l66VW259EA
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ –
एकदिवसीय संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डेनियल, फैसल अकरम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मुहम्मद इरफान खान, सईम अयूब, सलमान अली आगा, शाहनवाज दहानी आणि तैयब ताहिर.
टी-20 संघ : अहमद डेनियल, अराफात मिन्हास, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), जहांदाद खान, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, ओमैर बिन यूसुफ, कासिम अकरम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफियान मोकीम, तैय्यब ताहिर आणि उस्मान खान.


