आज भारत विरद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्याचा टॉस पाकिस्तानने जिकला. यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात काही निराशाजनक झाली. पाकिस्तानचे ओपनर इमाम उल हक आणि बाबर आझम यांची लवकर विकेट पडली. यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मोठी पार्टनरशिप केली. यानंतर टीम इंडिया बॅक फूटवर गेली. यानंतर अक्षर पटेलने मोहम्मद रिझवानची विकेट घेऊन ही जोडी फोडली आणि टीम इंडियाला पुन्हा गेममध्ये आणले. यानंतर हार्दिक, कुलदीप आणि हर्षित राणा यांनी ठराविक अंतराने विकेट घेतल्या. पाकिस्तानने ४९.४ ओव्हरमध्ये २४१ धावा केल्या. यामध्ये सौद शकील याने सार्वधिक ६२, रिझवानने ४६ आणि कुशदिल शहाने ३८ धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव पाकिस्तानची प्लेईंग 11 : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद