Pakistan News : पाकिस्तानी सैन्याने (Pakistan News) बलुचिस्तानमध्ये केलेल्या कारवाईमध्ये ३५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि तीन हाय प्रोफाइल वरिष्ठ कमांडरांना पकडण्यात आले आहे. बलुचिस्तानच्या मंगला झारघून घर भागामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, असे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी रविवारी रात्री सांगितले. बलुचिस्तानमधील टीटीपी दहशतवादी (Pakistan News) आणि या संघटनेशी संबंधित बलुचिस्तानमधील गटांविरोधातली ही मोहिम १३ मे रोजी सुरू झाली. गेल्या चार दिवसात ३५ दहशतवादी मारले गेले. पकडलेले तिन्ही कमांडर हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि बलुचिस्तान प्रांतात यापूर्वी पकडलेल्या अतिरेक्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Pakistan News सुरक्षा दलांनी मंगला जरघून घर भागातील अनेक तळही उद्ध्वस्त केले. या दहशतवादी घटकांचे सूत्रधार, पाठीराखे आणि आर्थिक समर्थक यांना पकडण्यासाठी विश्वसनीय आणि कारवाईयोग्य गुप्त माहितीच्या आधारे प्रांतात अतिरिक्त कारवाया सुरू आहेत, असे रिंद यांनी सांगितले. या ताज्या दहशतवादविरोधी कारवाईसंदर्भात पाकिस्तानी (Pakistan News) लष्कराने अद्याप निवेदन जारी केलेले नाही. गेल्या बुधवारी बलुचिस्तानच्या बरखान जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या शोधमोहिमेदरम्यान एका मेजरसह पाच जवान शहीद झाले होते. त्या कारवाईदरम्यान किमान सात दहशतवादी ठार झाले होते, असे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटले आहे.