Pakistan: ‘बॅट’ निवडणुक चिन्ह मिळवण्यासाठी इम्रान खान यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
Updated On:

लाहोर – आगामी निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह अबाधित राखण्याचा शेवटचा पर्याय म्हणून इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पीटीआय पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेण्यात यावे, हा निवडणूक आयोगाचा निर्णय पेशावर उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत पेशावर उच्च न्यायालयाने काल आपला निकाल दिला. त्याच वेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
त्यामुळे पीटीय पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. पीटीआय पक्षाने घेतलेल्या पक्षांतर्गत निवडणुका अवैध असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने पक्षाचे क्रिकेटची बॅट हे निवडणूक चिन्ह काढून घेतले होते.





