इस्लामाबाद – पाकिस्तानला आज ४ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. पाकिस्तानच्या राष्ट्रीय भूकंपमापन संस्थेने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. हा भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किमी खोलीवर झाला, त्यामुळे भूकंपानंतरचे अनेक सौम्य धक्के बसण्याची शक्यता निर्माण झाली, असेही निवेदनात म्हटले आहे. खोल भूकंपांपेक्षा उथळ भूकंप सामान्यतः जास्त धोकादायक असतात. कारण उथळ भूकंपांमधून येणाऱ्या भूकंपाचे हादरे पृष्ठभागावर पोहोचण्याचे अंतर कमी असते. त्यामुळे जमिनीचे हादरे अधिक तीव्र होतात आणि बांधकामांचे अधिक नुकसान होण्याची आणि जास्त जीवितहानी होण्याची शक्यता असते. पाकिस्तान युरेशियन आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर आहे, तिथे या भूस्तरांची एकमेकांशी टक्कर होते या टकरीमुळेच भूकंप होतात. पाकिस्तानच्या बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि गिलगीट बाल्टीस्तान प्रांतांमध्ये असे भूस्तर एकमेकांच्या जवळ सरकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आशियामध्ये सिंध, पंजाब आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर प्रांत भारतीय भूभागाच्या वायव्य काठावर आहेत. त्यामुळे या प्रदेशात मोठे भूकंप होण्याची शक्यता असते. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्येही २.० रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले गेले आहेत. यामुळे कोठेही कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.