पिंपरी | राऊत विद्यालयात विद्यार्थ्यांकडून पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन

जाधववाडी, (वार्ताहर) – ज्ञानाई शिक्षण संस्थेच्या कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी बालवर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमात गुरु व शिष्य यांचे नाते किती आगळे वेगळे आहे, याची माहिती वैशाली पारेकर यांनी सांगितली. तर विद्यार्थ्यांनी गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालक व शिक्षक यांचे पाद्यपूजन केले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल राऊत, सचिव शकुंतला राऊत, सदस्य सोमनाथ राऊत, कांचन राऊत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल राऊत अभिजीत राऊत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा लोखंडेयांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला मीनाक्षी लामतुरे, ज्योती सिंघन, धनश्री भोसले, माधुरी पाटील, स्नेहल कुलकर्णी, प्राजक्ता येवले, शिल्पा मानमोडे, सविता वाळुंज, लक्ष्मी रणदिवे, स्मिता बुधवंत, आशा कुंभार, पोर्णिमा आदक, सुजाता सोमवंशी, सुरेखा गोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वैशाली पारेकर यांनी केले. सीमा गायके यांनी आभार मानले.





