Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकरांचं एका कार्यक्रमादरम्यान खूप कौतुक केले आहे. राज्यात 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा आमदार कुणी असेल तर तो म्हणजे गोपीचंद पडळकर असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे उपस्थित असताना सदाभाऊ खोत यांनी असे म्हंटले आहे. गोपीचंद पडळकर यांचं कौतुक करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “जत तालुक्यामध्ये गेल्या 100 वर्षांमध्ये विकास झाला नाही तेवढा विकास आमदार गोपीचंद पडळकरांनी दीड वर्षात केला. नगरपालिका, झेडपी, पंचायत समिती निवडून आणली. मी तर म्हणतो, आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कुणी असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर होय. आता मी असं म्हटल्यावर काही लोक आमच्यावर टीका करायला लागतील. पण आम्हाला दोघांना माहिती आहे, कुठं बटन दाबायचं आणि आम्ही ते बरोबर दाबतो.” Sadabhau Khot ‘वेळ पडली तर देवाभाऊसाठी ते बाजीप्रभू होऊन लढतील’ तर सदाभाऊ खोत जयकुमार गोरे यांचे कौतुक करत म्हणाले की, “दुष्काळी भागातील तडफदार नेता म्हणजे जयकुमार गोरे आहे. गोपीचंद पडळकर आणि जयकुमार गोरे हे दोन नेते सत्याच्या बाजूने लढणारे आहेत. वेळ पडली तर देवाभाऊसाठी ते बाजीप्रभू होऊन लढतील. गोपीचंद पडळकर असो व जयाभाऊ, प्रस्थापितांना ते बरोबरचे वाटत नाहीत. यांनी एखादा वार केला तर तो का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत असं प्रस्थापित म्हणतात. पण त्यांना सांगतोय की, हे आता बरोबरीचे नाहीत तर तुमच्या छाताडावर पाय ठेऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. कारण प्रस्थापितांना बाजूला सारून विस्थापितांना घेऊन चालणारं राज्याचं नेतृत्व आहे”, असे सदाभाऊ खोत म्हणाले. Sadabhau Khot हेही वाचा: Tara Sutaria: कान्स २०२६मध्ये तारा सुतारियाचा ग्लॅमरस जलवा; ऑफ-व्हाईट गाऊनमध्ये जिंकली सगळ्यांची मनं