पी. चिदंबरम एम्समध्ये दाखल
Updated On:

नवी दिल्ली : इडीच्या कोठडीत असणाऱ्या पी. चिदंबरम यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) सोमवारी दाखल करण्यात आले.
चिदंबरम हे 21 ऑगस्ट पासून सीबीआय कोठडीत होते. त्यांना या प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाने जामीन मंजूर केला. पण शध्या ते इडीच्या कोठडीत आहेत. त्यांना पोटदुखीची तक्रार केल्यानंतर देशातील सर्वात अद्ययावत अशा एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा तिहार कारागृहात हलवण्यात आले. त्यांच्यावर आयएनएक्स मिडीया प्रकरणात अरोप केले असून त्यांची चौकशी सुरू आहे.





