Vigneshwara Temple, Ozar : श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर येथे प्रजासत्ताकदिना निम्मित लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. पहाटे ठीक ५ वाजता श्रींची महापूजा करून ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिम्मित मूर्ती पुढे आकर्षक तिरंग्याची फुलांची सजावट करण्यात आली होती. विघ्नहराच्या दोन्ही बाजूस भारतीय ध्वज ठेवण्यात आले होते.पहाटे पासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.प्रजासत्ताक दिनानिम्मित श्री क्षेत्र ओझर येथे विविध परिसरातील विद्यालय व शाळांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापैकी श्री विघ्नहर विद्यालय ओझर येथील शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व श्री विघ्नहर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षण गणेश राऊत सर यांनी केले. ध्वजाला मानवंदना व संचलन विघ्नहर विद्यालयातील झाशीची राणी गाईड पथक ,राजमाता जिजाऊ गाईड पथक,महाराणा प्रताप स्काऊड पथक ,श्री छत्रपती शिवाजी महाराज स्काऊड पथक यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष तुषार कवडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त संतोष कवडे, विनायक मांडे, सुर्यकांत रवळे, प्रकाश मांडे, विलास कवडे, समीर मांडे शिल्पा जगदाळे तसेच ओझर गावचे सरपंच तारामती कर्डक उपसरपंच जयश्री कवडे, ग्रामपंचायत सदस्य ओझर न -१ चे सरपंच राजश्री कवडे, उप सरपंच विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कवडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कवडे, अनिकेत रवळे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संतोष कवडे , ओझर नं-२ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष निलेश टेंभेकर, ओझर गावचे पोलीस पाटील मोहन कवडे व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्या नंतर विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण गावातून विद्यालयातील विद्यार्थी यांची प्रभात फेरी घोषणा देऊन संपन्न झाली ,विद्यालयातील विद्यार्थी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगट सर यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला.