‘मुस्लिमांबद्दल खूप काही…’, असदुद्दीन ओवेसी हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर भडकले

Owaisi On Himanta Biswa Sarma । एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या राज्यातील मुस्लिम लोकसंख्या ४० टक्क्यांवर पोहोचल्याच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. हिमंता बिस्वा सरमा हे देशातील पहिल्या पाच लबाडांपैकी एक आहेत. असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. तसेच त्यांनी तुम्ही मुस्लिमांच्या लोकसंख्येबद्दल इतके घाबरता का? असा सवाल देखील विचारला.
ते आसामच्या मुस्लिमांचा द्वेष करतात Owaisi On Himanta Biswa Sarma ।
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हिमंता बिस्वा यांच्यावर टीका करताना त्यांनी , “आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील पहिल्या पाच लबाडांपैकी एक आहेत. ते आसामच्या मुस्लिमांचा द्वेष करतात. सत्य हे आहे की 1951 मध्ये आसाममध्ये मुस्लिम लोकसंख्या 24.68 टक्के होती.अशी माहिती देखील त्यांनी यावेळी तिला.
असम के मुख्यमंत्री झूठे हैं और नफ़रत करते हैं असम के मुसलमानों से। इतना झूठ बोलते हैं कि इनकी झूठ की वजह से पूरा प्रशासन और ऑफिसर्स मुसलमानों से नफ़रत कर रहे हैं। – बैरिस्टर @asadowaisi #Assam #AsaduddinOwaisi #owaisi pic.twitter.com/L1ShrJbpdK
— AIMIM (@aimim_national) July 18, 2024
ते पुढे म्हणाले, “2001 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 30.92 टक्के होती आणि 2011 च्या जनगणनेत ती 34.22 टक्के होती.” आता 2024 मध्ये ती 40 टक्के होऊ शकते तर त्यात काय एवढं ? त्याच्या खोटेपणामुळे संपूर्ण प्रशासन मुस्लिमांचा द्वेष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
असदुद्दीन ओवेसींनी काय प्रश्न विचारला? Owaisi On Himanta Biswa Sarma ।
असदुद्दीन ओवेसी यांनी विचारले की, आसाममध्ये ४० टक्के मुस्लिम आहेत तर त्यात असंवैधानिक काय? ते म्हणाले, “तुम्ही अल्पसंख्याकांना काय संदेश देत आहात? या लोकसंख्येबद्दल तुम्ही का घाबरता? ते भारतीय आहेत. राजकीयदृष्ट्या, तुम्ही हरले पाहिजे आणि मला आशा आहे की तुम्ही आसाममध्ये वाईटरित्या पराभूत व्हाल आणि तुमचा पक्ष आसाममध्ये नष्ट होईल. तुम्हाला ४० टक्के मुस्लिमांना टार्गेट करण्याचा अधिकार नाही.
खरं तर, हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी सांगितले होते की आसाममध्ये लोकसंख्या बदल ही मोठी समस्या आहे. त्यातही मुस्लिमांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यालाच ओवेसी यांनी उत्तर दिले आहे.





