Waghapur : किल्ला बांधणी स्पर्धेला आंबळे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
Waghapur : बुधवारी (दि. ११) या स्पर्धेचे परीक्षण बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक व इतिहास अभ्यासक समीर कुंभारकर यांनी केले. यावेळी दत्तात्रय जगताप, भूषण जगताप, शुभम जगताप, अजिंक्य दरेकर व प्रथमेश जगताप उपस्थित होते.

वाघापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आंबळे येथील विठ्ठल रामचंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित किल्ला बांधणी स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ४० बालस्पर्धकांनी सहभाग घेत विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक व हुबेहूब प्रतिकृती साकारल्या.
बुधवारी (दि. ११) या स्पर्धेचे परीक्षण बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक व इतिहास अभ्यासक समीर कुंभारकर यांनी केले. यावेळी दत्तात्रय जगताप, भूषण जगताप, शुभम जगताप, अजिंक्य दरेकर व प्रथमेश जगताप उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास ९ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ३ हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकास १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रोत्साहनपर बक्षीस व सन्मानपत्र दिले जाणार असून, लवकरच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये शिवइतिहासाची गोडी, सर्जनशीलता आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण होत असल्याने ग्रामस्थांकडून आयोजकांचे कौतुक होत आहे.


