“तीन महिन्यात राज्यांतून ५ हजारांपेक्षा जास्त मुली बेपत्ता”; रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती, गृहविभागाकडे तपासाची मागणी

Updated On:

मुंबई : राज्यात  कायदा आणि सुव्यवस्था  अत्यंत सुरळीतपणे असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या दाव्याला फोल ठरवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातुन रोज सरासरी ७० मुली बेपत्ता  होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ही माहिती देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी,  “जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? असा सवाल यातून त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी,”मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही आम्ही घेतला. यामध्या राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतली आव्हानं आणि उपाय योजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. ” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावलं उचलावीत अशीही मागणी चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान,   राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे.  असे त्यांनी म्हटले होते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर

2026-10-08 11:03:31

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर