कराड – सातारा जिल्ह्याच्या विविध भागांतील एकूण 35 जण येथील करोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 23 तर सह्याद्री हॉस्पिटलमधून 12 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 144 करोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी करोनामुक्त झालेल्यांमध्ये म्हासोली येथील 27 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला व 71 वर्षीय पुरूष, कलेढोण येथील 45 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील सदुवर्पेवाडी-सळवे येथील 35 वर्षीय पुरूष, मोरगिरी येथील 72 वर्षीय महिला, मानेचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, आढे येथील 35 वर्षीय पुरूष, म्हावशी येथील 45 वर्षीय पुरूष, शिराळ येथील 52 वर्षीय महिला, तामिनी येथील 7 वर्षीय मुलगी, मोरगिरी येथील 65 वर्षीय पुरूष, माणमधील दहिवडी येथील 28 वर्षीय महिला व 34 वर्षीय महिला, वाईतील देगाव येथील 42 वर्षीय महिला व धामणी येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक, 35 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय पुरूष, मालतपूर-चिखली येथील 24 वर्षीय युवक, सिद्धनाथवाडी येथील 52 वर्षीय पुरूष, सातारा तालुक्यातील कास खुर्द येथील 44 वर्षीय पुरूष, कराडमधील शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष यांचा समावे आहे.
सह्याद्री हॉस्पिटलमधून करोनामुक्त झालेल्यांमध्ये सातारा तालुक्यातील कुस बुद्रक येथील महिला, खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील दोन महिला व तीन पुरुष, खंडाळा येथील एक महिला, दोन पुरुष, कराड तालुक्यातील शेणोली येथील दोन पुरुष व खटाव तालुक्यातील वडूज येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. या सर्वांना दोन्ही रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.
कृष्णा हॉस्पिटलमधील करोनामुक्त रूग्णांचा नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संतोष टकले, डॉ. राहुल फासे, राहुल माळी, अवधूत अवसरे, श्रीनिवास जोशी, विशाल पाटील, इम्रान इनामदार, रश्मी पंढरपुरे, दीपाली धोत्रे, वनिता नावडकर, श्रीपाद खुपसंगीकर, अस्मिता देशपांडे, नंदिनी चव्हाण, महेंद्र आलाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, डॉ. विश्वास पाटील, विक्रम पवार यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.