Nevase News : बेलपांढरी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश!
Nevase News : या यशामागे वर्गशिक्षक जनार्धन गवांदे, मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक युवराज थोरात, संतोष जाधव, संदीप जंगले आणि शिक्षिका प्रतिमा राठोड यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन लाभून विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत ठरली.

नेवासे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यावतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता चौथी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बेलपांढरी (ता.नेवासे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोववला आहे.
इयत्ता चौथीच्या परीक्षेत या शाळेचा ९० टक्के निकाल लागलेला असून १६ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे तर इयत्ता सातवीच्या परीक्षेत सर्व ३ विद्यार्थी यशस्वी ठरल्याने शाळेचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. इयत्ता चौथीमध्ये वैभवी योगेश गारुळे हिने (२७०) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर आदिती भरत ताके (२५४ गुण) मिळवून या विध्यार्थीनेने द्वितीय तर स्वरा संभाजी गारुळे हिने (२५२ गुण) मिळवत तृतीय क्रमांक मिळविलेला आहे.
या तर शिवराज बाळासाहेब गारुळे (२३२), कृष्णा सचिन गारुळे (२२२), श्रद्धा दत्तात्रय गारुळे (२२२), समर्थ दत्तू ताके (२१४), सोहम सुदाम माळी (२०६),आयान बहादूरखा पठाण (२०२), देवयानी शरद वरुडे (१९८), समर्थ बाळासाहेब गारुळे (१९६), कुणाल बाळासाहेब पवार (१८२), वैष्णवी बर्डे (१७८), सुकन्या गणेश गायकवाड (१७०),आदेश दिलीप गारुळे (१६६), गौरव अजय झिंजुर्डे (१६४),काजल बाळासाहेब मोरे आणि दिपाली विलास थोरात यांनीही या परीक्षेत अधिक यश संपादन केलेले आहे.
इयत्ता सातवीमध्ये कावेरी किशोर साबळे (१७६),ओम भरत कांबळे (१५८) आणि यश दिलीप गारुळे (१४०) यांनी यश मिळवत शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशामागे वर्गशिक्षक जनार्धन गवांदे, मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक युवराज थोरात, संतोष जाधव, संदीप जंगले आणि शिक्षिका प्रतिमा राठोड यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन लाभून विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत ठरली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रप्रमुख विनायक कदम, केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद, केंद्रमुख्याध्यापक कल्याणराव शिंदे, गटशिक्षणाधिकारी भागिनाथ बडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गारुळे, ग्रामसेवक बारसे भाऊसाहेब, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमींनी या यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे आणि शाळेचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





