पोलिसांकडील 97 तक्रारींपैकी 66 तक्रारींचे झाले निवारण

बोटिंग नियमनाच्या यंत्रणेचा जिल्हा प्रशासनाकडून शोध

सातारा  – सातारा पोलिस दलाच्या वतीने शनिवारी शिवतेज सभागृहात आयोजित पोलिस तक्रार निवारण दिन उपक्रमात सातारा शहर, तालुका, शाहूपुरी व बोरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 97 तक्रारदार उपस्थित होते. पोलिसांनी यातील 66 तक्रारींचे निवारण करुन त्याचा निपटारा केला. पोलिसांच्या या उपक्रमामुळे तक्रारदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तक्रार निवारणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा तालुक्‍याचे पोलीस निरीक्षक साजन हंकारे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, सातारा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनतेचा वेळ अन्‌ पैसा वाचावा म्हणून उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर अशा प्रकारे तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती धीरज पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.