जनतेच्या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच ! चेतन तुपे यांनी व्यक्त केला विश्वास

हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंबामुळे आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना जनतेकडून पाठींबा मिळत आहे. जनतेकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे माझे मनोधैर्य वाढले आहे. जनतेच्या या ताकदीमूळे आपला विजय नक्कीच आहे.असा विश्वास आमदार चेतन तुपेंनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवेंद्र भाट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुषार रासगे, सुरज वर्मा, गणेश उबाळे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तसेच लहू गर्जना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कांबळे, उपाध्यक्ष अमित मोहिते, लहू पारवे, सतीश सकट, प्रताप मोरे, गणेश देवकुळे, लक्ष्मण केंदळे, भानुदास शिंदे, दत्ताभाऊ आवाड, कादिर बेग, अमोल पारधे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून चेतन तुपे यांना पाठिंबा दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे,कार्याध्यक्ष अमर आबा तुपे, जतीन कांबळे, अनिल लोणकर ,मयूर खलसे, गणेश ढाकणे , आजिनाथ मामा भोईटे , इंद्रसेन काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली
हडपसर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना मतदार संघातून मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार करत येथील सामाजिक व राजकीय संघटना तसेच इतर पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली असून, यांच्यामुळे मताधिक्य वाढून आपला विजय होईल, असे चेतन तुपे यांनी नमूद केले.
अनेकांच्या पक्ष प्रवेशाने चेतन तुपेंची ताकद वाढली
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवेंद्र भाट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुषार रासगे, सुरज वर्मा, गणेश उबाळे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून चेतन तुपे यांना पाठिंबा दिला. आमदार चेतन तुपे यांनी या सर्वांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
हडपसरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करूया असे यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे,कार्याध्यक्ष अमर आबा तुपे, जतीन कांबळे, अनिल लोणकर ,मयूर खलसे, गणेश ढाकणे , आजिनाथ मामा भोईटे , इंद्रसेन काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सक्षम भाट, आदित्य भाट, मयूर मुंबासे, स्वप्निल चव्हाण, नीलम सिंग, मुकुंद माने, अनंता ढिले, दीपक पुरी, दीपक छाकड, गणेश घावरे, संजय कदम, सोनू गागडे, गणेश गुमाने, सुधीर गुमाने, राज शिंदे, अजिंक्य साने, नागेश गायकवाड यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला.
तसेच सोमा कांबळे, विनायक गायकवाड, शुभम भंडारी, प्रकाश अहिरे, सुरेश खरपुरे, गणेश ढिले, राहुल ढिले, प्रदीप ढिले, दीपक ढिले, बाळासाहेब सणस, खंडू गायकवाड, विलास माने, सुधाकर देशमाने, रोहन शहा, अनिकेत ढिले, सुनील ढिले, मनोज ढिले, नंदकुमार ढिले, अमोल ढिले, अतुल ढिले, संदीप ढिले, मनीष ढिले, विजय ढिले, राजेंद्र ढिले, एकनाथ ढिले, जितेंद्र तिकोणे, केतन भोकरे, अक्षय भोकरे, यश ढिले, ओम घोलप, महेश घोलप, शशिकांत ढिले, रोहित ढिले, तुळशीराम ढिले, गणेश ढिले, अनिकेत ढिले, विशाल ढिले, सुभाष ढिले, मंगेश ढिले, प्रमोद ढिले, प्रशांत ढिले, विलास ढिले,विक्रम ढिले, अस्वाती रावत, मनोज कसबे, विवेक दुबे, धर्मो तामचिकर, विनोद बागडे, अभिजीत जाधव, अभिजीत बाटुंगे, शंतू अभंगे, अश्वनी रावत, अशोक सिंह, हरसल डाके या सर्वांनी प्रवेश केला.
लहू गर्जना ग्रुपचा चेतन तुपे यांना जाहीर पाठिंबा
पक्ष प्रवेशामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे यांचा विजय निश्चित लहू गर्जना ग्रुपने विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांना एकमताने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजासाठी घेतलेल्या हितकारक निर्णयांमुळे आम्ही चेतन तुपे यांच्या सोबत आहोत. ते हडपसरचा गतिमान विकास साधू शकतील त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे लहू गर्जना ग्रुपचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.
यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने चेतन तुपे यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे महायुती अधिक मजबूत झाली असून हडपसर मध्ये चेतन तुपेच निवडून येणार असा विश्वास या सर्वांनी दिला आहे. दोन दशकांहून अधिक काळ लहू गर्जना ग्रुपचे कार्य हडपसर परिसरात तसेच राज्यभरात विस्तारले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुती सरकारमध्ये मातंग समाजहिताचे घेतलेले योग्य निर्णय, मागण्या यांची नेहमीच दखल घेतली आहे. आज लहू गर्जना ग्रुपने हडपसर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे.
याबद्दल चेतन तुपे यांनी त्यांचे आभार मानले. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देत स्वागत केले. वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्फूर्तिदायक विचारांचा जागर करणाऱ्या, समाजासाठी विधायक कार्य करणाऱ्या लहू गर्जना ग्रुपने चेतन तुपे यांना पाठींबा दिल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात तुपे यांचे पारडे जड झाले आहे.
लहू गर्जना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कांबळे, उपाध्यक्ष अमित मोहिते, लहू पारवे, सतीश सकट, प्रताप मोरे, गणेश देवकुळे, लक्ष्मण केंदळे, भानुदास शिंदे, दत्ताभाऊ आवाड, कादिर बेग, अमोल पारधे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि तमाम सहकाऱ्यांचे चेतन तुपे यांनी संघटनेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.





