नागपूर – पक्ष फुटतात, पक्ष एकमेकांबरोबर राहात नाहीत. पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितले ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिले, तेव्हा मला मनापासून दुःख झाले.
आता या ठिकाणी कुणाकडून अपेक्षा करावी? आमचा विरोध कुठल्याही जातीला किंवा धर्माला नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा बनण्यासाठी कौल जनतेने दिला.
त्याचवेळी महाराष्ट्रात आपण कमी पडलो याची खंतही आपल्याला आहे. महाराष्ट्रात पक्षात आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती. चार पक्षांशी होती, चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह.
रोज खोटं बोलायचे आणि रेटून बोलायचे, तसं झालं की ते लोकांना खरं वाटू लागते. फेक नरेटिव्हला आपण परिणामकारकरित्या उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की काही मतं कमी झाली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.