नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या. यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात चर्चा सुरू झाली. अशात खाते वाटपावरूनही शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे आता लवकरच राजीनामा देतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. या सर्व चर्चांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,’आमचे आमदार समजुदार ते नाराज नाही. हे सरकार राज्याचा विकास करेल. केंद्र आपला पालक असून केंद्र सरकार आपल्याला नेहमीच मदत करतात. अनेक लोक हिताचे प्रकल्प सुरू झाले आहे. मोदी साहेब आपल्याला मदत करत आहे. असेही ते म्हणाले आहे. आज निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्र्यानी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती.