Amol Khatal Patil : ‘आमचा इतिहास बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा, भूगोल महाराष्ट्राच्या मातीचा’; शिंदेसेनेच्या नेत्याचं बाळासाहेब थोरातांना सणसणीत प्रत्युत्तर
Amol Khatal Patil : शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Amol Khatal Patil : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवर शिंदेसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
याच मुद्द्यावरून शिंदेसेनेच्या पाच प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त केला. या प्रकारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या टीकेला शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, “आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रती काही अर्धवट मंडळींनी फाडल्या. एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुस्तक वाचावं आणि त्यातील मुद्द्यांवर बोलावं. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे.”
आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रती काही अर्धवट मंडळींनी फाडल्या. एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुस्तक वाचावं आणि त्यातील मुद्द्यांवर बोलावं. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे.
या कृतीत पुढे असलेल्यांपैकी सारे जण सत्तेच्या जवळ राहण्यासाठी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना स्वतःचाच इतिहास-भूगोल नाही, त्यांनी सोनियाजींच्या जीवन प्रवासावर बोलावे हेच हास्यास्पद आहे. सार्वजनिक जीवनात मतभेद व्यक्त करतानाही सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
सोनियाजींचा त्याग, त्यांचा संघर्ष आणि देशाप्रती त्यांचं समर्पण आम्ही जवळून पाहिलं आहे. या पुस्तकातून तो जीवनप्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समजून घेण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. अशा प्रकारांमुळे उलट अधिक लोक हे पुस्तक वाचतील, असा मला विश्वास आहे.
@SoniaGandhi @INCIndia
@INCMaharashtra @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @SupriyaShrinate @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 18, 2026
पुढे बोलताना थोरात यांनी, ज्यांना स्वतःचाच इतिहास आणि भूगोल माहिती नाही, त्यांनी सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावर बोलणे हास्यास्पद असल्याची टीकाही केली होती. त्यांच्या या विधानानंतर शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
पोस्टमध्ये अमोल खताळ पाटील काय म्हणाले?
“आमचा इतिहास बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा आहे आणि भूगोल महाराष्ट्राच्या मातीचा. तुमचा इतिहास म्हणजे दिल्लीच्या दरबारात मुजरा आणि भूगोल म्हणजे १० जनपथचा उंबरठा!” अशा शब्दांत अमोल खताळ पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.
थोरात साहेब म्हणतात, “ज्यांचा इतिहास-भूगोल नाही, त्यांनी सोनिया गांधींवर बोलू नये.”
आमचा इतिहास बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा आहे आणि भूगोल महाराष्ट्राच्या मातीचा.
तुमचा इतिहास म्हणजे दिल्लीच्या दरबारात मुजरा आणि भूगोल म्हणजे 10 जनपथचा उंबरठा!एका पुस्तकासाठी काँग्रेसचे सगळे नेते रस्त्यावर उतरले.
पण सावरकरांचा अपमान झाला, तेव्हा महाराष्ट्रातल्या एकाही
काँग्रेस नेत्याच्या तोंडून निषेधाचा एक शब्द निघाला नाही!राहुलजी म्हणाले, जेवताना मम्मी पप्पांच्या मांडीवर बसायच्या.
खरं आहे! काँग्रेसमध्ये मांडीवर बसायची परंपराच आहे.
पक्ष घराण्याच्या मांडीवर, घराणं सत्तेच्या मांडीवर आणि थोरात साहेब ५० वर्षं दिल्लीच्या मांडीवर!
आणि हे आम्हाला “इतिहास-भूगोल” शिकवणार?@TV9Marathi @abpmajhatv @News18_marathi @zee24taasnews
@jaimaharashtran @LokshahiMarathi
@LoksattaLive @lokmat @SakalMediaNews @mataonline#BalasahebThackeray #Hindutva #Congress #VeerSavarkar #SoniaGandhi
— Amol Khatal Patil – अमोल खताळ पाटील (@amolkhatalpatil) November 18, 2026
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक आणि तिरस्कारयुक्त लेखन करण्यात आल्याचा आरोप शिंदेसेनेच्या नेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन येथे पाच प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.





