मुंबई – बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. सतीश कौशिक हे कॉमेडी अभिनयासाठी प्रसिद्ध होते.
अभिनयासह कौशिक यांनी दिग्दर्शन आणि चित्रपटांचा निर्माता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये आपले योगदान दिले. कौशिक यांनी मिस्टर इंडियामध्ये केलेली कॅलेंडरची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यासोबतच सलमान खानच्या तेरे नाम या सुपरहिट चित्रपटाचे कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
दरम्यान, कौशिक यांच्या जाण्यानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिग्गजानी कौशिक यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. सतीश कौशिक यांचे जिवलग मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून आपल्या जिगरी दोस्तला श्रद्धांजली वाहिली आहे.
“मृत्यू दुनियेचं अंतिम सत्य आहे. पण सतिश शिवाय आयुष्य पूर्वी सारखं राहणार नाही.. आमच्या 45 वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती..,!’ असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.