लॉस एँजेलिस – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. नुकतंच यंदाचा 2021 सालालीत 93 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडला.
या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’ सिनेमाची वर्णी लागली आहे. तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरंत या सिनेमाने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बाजी मारली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
It’s official! #Oscars pic.twitter.com/EjlbzePvqR
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
तर या सिनेमासाठी अभिनेत्री ‘फ्रान्सिस मॅकडॉर्मंड’ हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आणि ‘क्लोई जाओ’ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
View the entire #Oscars In Memoriam gallery here: https://t.co/9xSUULwz3k
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
दरम्यान, यंदा नेहमीसारखा साजरा होणाऱ्या ऑस्कर सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीने पार पडतो आहे. जगभरात कोरोनाचा कहर आहे. त्याची दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या आहेत.