लॉस एँजेलिस – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. नुकतंच यंदाचा 2021 सालालीत 93 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडला.
दरम्यान, यंदा नेहमीसारखा साजरा होणाऱ्या ऑस्कर सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीने पार पडतो आहे. जगभरात कोरोनाचा वाढता कहर आहे. त्याचीच दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या. 93 वा अकॅडमी पुरस्कार सोहळा यावेळी “नोमाडलँड’ या चित्रपटाने आपली एक विशिष्ठ छाप सोडली.
या चित्रपटाने तब्बल तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरलं आहे. अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ‘क्लोई जाओ’ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या वाट्याला एक भावुक करणारा क्षण आला. होय यावेळी बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते ‘इरफान खान’ आणि ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत ‘भानू अथय्या’ यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी भारावून टाकणारा क्षण ठरला.
29 एप्रिल 2020 रोजी सिने अभिनेता ‘इरफान खान’ने या जगाचा निरोप घेतला. ‘पान सिंह तोमर’, ‘मकबूल’, ‘पिकू’, ‘कारवाँ’, ‘मदारी’ अशा अफलातून चित्रपटांतून इरफान खान जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा प्रत्येक वेळी ते नव्याने काय घेऊन आले आहेत, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. प्रत्येक पात्रासह इरफान वेळोवेळी काहीतरी सांगून जात होता. म्ह्णूनच आज सुद्धा प्रत्येक चित्रपट प्रेमीच्या मनात इरफान जिवंत आहे.