कुसुमाग्रज जयंतीनिमित्त ‘मी मराठी जागर’ कार्यक्रमाचे आयोजन
Updated On:

पुणे : पूना गेस्ट हाऊस स्नेह ‘मंच’च्या वतीने कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि .वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच मराठी भाषा दिनानिमित्त मी मराठी जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चारचौघी प्रस्तुत नवलाख तळपती दीप या कुसुमाग्रजांवर आधारित गीत, संगीत काव्याची कुसुमांजली यावेळी वाहण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांसाठी कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश आहे.
कार्यक्रमाची संकल्पना विद्या नितीन यांची आहे. शिल्पा देशपांडे, केतकी देशपांडे, रत्ना दहिवेलकर, प्रणव तडवळकर, विद्या नितीन हे सादरीकरण करणार आहेत. तुषार दीक्षित, केदार तळणीकर, नरेंद्र काळे यांचे वादन यावेळी होणार आहे. अनघा धायगुडे,रवींद्र शाळू यांचा अतिथी सहभाग कार्यक्रमात असणार आहे.
अजित कुमठेकर हे या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत़ तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांनी केले आहे.





