पिंपरी | पर्यावरण जनजागृती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईसीए (पर्यावरण संवर्धन समिती) च्या माध्यमातून शाळा, कॉलेज व शहरातील सोसायटी गाव इत्यादी परिसरात एक विषय घेऊन पथनाट्य किंवा प्रत्यक्ष कृती करून, त्याचे सादरीकरण करून जनजागृती करणे. या स्पर्धेत ६ वर्षाच्या मुलीपासून तर ७० वर्षे वय असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला.
पाणीबचत, वृक्ष लागवड, प्लास्टिक कचरा समस्या, ई कचरा समस्या जागतिक तापमान वाढ समस्या याविषयी स्पर्धकांनी जनजागृती केली. ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २५ निवडक स्पर्धकांना चिंचवड येथे सायन्स पार्क मध्ये बोलावून त्याचे सादरीकरण करून परीक्षण करण्यात आले.
व दोन स्पर्धकांची निवड करून त्यांना लॅपटॉप बक्षीस म्हणून देण्यात आला. सहभागी स्पर्धकांना पिण्यासाठी स्टीलची बॉटल देण्यात आली तसेच परीक्षकांना व प्रमुख पाहुण्यांना उच्च दर्जाची कापडी पिशवी भेट देण्यात आली.
प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर पर्यावरण विभाग संजय कुलकर्णी सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे इसीएच्या अध्यक्ष विनिता दाते सेक्रेटरी हिरामण भुजबळ सर्व ट्रस्टी व टीम लीडर्स स्पर्धकांचे नातेवाईक उपस्थित होते.
अध्यक्ष्या विनिता दाते यांनी पर्यावरण रक्षण विषयी मार्गदर्शन केले. सहा वर्षाच्या चार्वी राक्षे हिने उपस्थितांची मने जिंकली. तिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून प्राध्यापक जाधव, देशपांडे, प्राध्यापक माळी सर, पोटे सर यांनी परीक्षण करून बक्षिसासाठी स्पर्धकांची निवड केली. तर अगना दिवाकर यांनी सूत्रसंचालन केले. कामथण यांनी आभार मानले.





