-->

रिअल इस्टेटमधील आशावाद परतला

महाराष्ट्रासह प. भातातील विकसक आशावादी

मुंबई – वर्ष 2020 च्या चौथ्या तिमाहीमधील (ऑक्‍टोबर – डिसेंबर 2020) नाइट फ्रॅंक- फिक्‍की-नरडेको रिअल इस्टेट सेंटिमेण्ट इंडेक्‍स सर्वेक्षणानुसार 2020 मध्ये पहिल्यांदाच विद्यमान सेंटिमेण्ट स्कोअरने चौथ्या तिमाहीमध्ये 54 गुणांसह आशावादी विभागात प्रवेश केला. मागील तिमाहीच्या तुलनेत स्कोअरमध्ये 14 गुणांची वाढ झाली.

भावी सेंटिमेण्ट स्कोअरने देखील 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमधील 52 गुणांपासून 2020च्या चौथ्या तिमाहीमध्ये 65 गुणांपर्यंत वाढीची नोंद केली. महाराष्ट्रासह पश्‍चिमी भागातील भावी सेंटिमेण्ट इंडेक्‍समध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली. भागधारकांच्या संदर्भात डेव्हलपर्स व नॉन-डेव्हलपर्सनी (बॅंका, एनबीएफसी व पीई फंड्‌स) भावी सेंटिमेण्ट स्कोअरमध्ये सुधारणा केली.

82 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, आगामी सहा महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था अधिक विकसित होईल, तर 2020च्या तिस-या तिमाहीमध्ये 57 टक्‍के प्रतिसादकांचे हे मत होते. कर्ज उपलब्धतेच्या संदर्भात 87 टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास होता की, पुढील सहा महिन्यांमध्ये आर्थिक स्थिती सुधारेल किंवा समान राहिल.

77 टक्‍के प्रतिसादकांचे मत होते की, पुढील सहा महिन्यांमध्ये निवासी विक्रीत वाढ होईल. 60 टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास होता की, पुढील सहा महिन्यांमध्ये कार्यालयासाठी जागा भाड्याने देण्याच्या व्यवहारामध्ये वाढ होईल.

नाइट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले, रिअल इस्टेटमधील उत्साहात वाढ झाली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी सुधारणा होण्याच्या आशा व्यक्‍त केल्या आहेत. नरेडको व असोचॅमचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी म्हणाले, हे भारतीय रिअल इस्टेटच्या प्रबळ विकासाचे संकेत मिळत आहेत. यामुळे 270 संबंधित उद्योगक्षेत्रांच्या संभाव्य विकासासोबत रोजगारनिर्मितीच्या आशा दिसून येतात.

2021 मध्ये अपेक्षित सकारात्मक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमध्ये बदल घडून येतील. 50 हून अधिक स्कोअर सेंटिमेण्ट्‌समधील आशावाद दाखवतो, स्कोअर 50 म्हणजे सेंटिमेण्ट समान किंवा तटस्थ आहे. तर 50 पेक्षा कमी स्कोअर सेंटिमेण्ट्‌समधील निराशावाद ला दाखवतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.