कर्नाटक-गोव्याच्या राजकारणावरून विरोधकांचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : देशातील राजकारणात सध्या एका पाठोपाठ एक भूकंप होताना दिसत आहेत. कर्नाटकचा सत्तासंघर्ष सुरू असतानाच गोव्यातील कॉंग्रेस आमदारांनी पक्षाचे राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, या परिस्थितीवरून भाजपावर निशाणा साधला आहे. त्यासाठी विरोधकांकडून दिल्लीत संसद भवन परिसरात निदर्शने करण्यात येत आहेत.

या निदर्शनांमध्ये कॉंग्रेसह तृणमुल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राजद, सीपीआय या पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला आहे. त्याचबरोबर युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देखील येथे सहभाग नोंदवला. दरम्यान, गोव्यात राजकीय घडामोडी घडल्या असून याचा मोठा फटका हा कॉंग्रेसला बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.