विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनपूर्वी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

Maharashtra assembly monsoon session 2025 | राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला घेरणार आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलं आहे. माघार सरकार, यू टर्न सरकार घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह सत्ताधारी आमदारही आक्रमक झाले. शिंदे शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निर्णय रद्द करावा लागला. अजूनही आम्ही लेखी आदेशाची वाट पाहत आहोत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या ११ वीच्या पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची माहिती समजली असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधक सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी, वैष्णवी हगवणे प्रकरण, शक्तीपीठ महामार्ग, लाडकी बहीण योजना, शेतमालाला हमीभाव, महागाई, रोजगार, गैरव्यवहार यासारख्या मुद्यांवर घेरणार आहे. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. Maharashtra assembly monsoon session 2025 |
राज्य सरकारमध्ये सत्ताधारी महायुतीचे संख्याबळ भक्कम असताना महाविकास आघाडीचे आमदार विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Maharashtra assembly monsoon session 2025 |
हेही वाचा:





