मुंबई – देशात एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे तर दुसरीकडे याविरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. तर काही राज्यांनी सीएएला विरोध करणारे ठराव संमत केले आहेत. असाच ठराव परभणी नगरपरिषदेत मंजूर केल्याच्या कारणावरून भाजपने दोन मोठ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत सीएएच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. याउलट ठरावाला मंजुरी दिली. याची गंभीर दखल घेत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
परभणी येथील पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष
विनोद हरीभाऊ बोराडे यांनी #CAA विरोधात नगरपरिषदेत ठराव केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याची धोषणा प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी केली आहे. pic.twitter.com/b3CuwMqJy3— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 4, 2020